Skip to main content

शहरी नक्षलवाद



           प.बंगालमधील नक्षलबाडी   येथून चालू झालेली जमीनदारांच्या विरोधातील हि चळवळ आज भारतातील मोठ्यामोठ्या शहरांच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या रूपांमध्ये पोहचली आहे. प्रथमतः  मुझुमदार, सन्याल यांनी ही चळवळ भूदास, शेतमजूर यांच्यासाठी जमीनदाराच्या विरुद्ध सशस्त्र क्रांतीचा  मार्ग अवलंबला. सुरूवातीला हि चळवळ जमीनदारांच्या जमीनी बळकावून भूदास,शेतमजूर, शोषित यांच्या मध्ये वाटण्यात आली  आणि नक्षलवादी चळवळ काही अंशी यशस्वी झाली. नंतर हि खूप प्रसिद्ध झाली याच्यातूनच आदिवासी, भूदास, शेतमजूर, शोषित , वंचित असे समाजातील वेगवेगळे गटातील लोक नक्षलवादी चळवळीला जोडत गेले.
हि चळवळ झपाट्याने देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचली.  जंगल, जमीन,जल याच्या साठी आपण लढत आहोत असे नक्षलवादी नेतृत्वाने बिंबवण्यास सुरुवात केली.याच्यातूनच मग विकासाला विरोध, राजकीय लोकांची हत्या, प्रशासनाच्या कामांमध्ये अडथळे निर्माण करण्यासारखे गोष्टी घडू लागले,
पोलीस दलावर गोळीबार करणे असे सातत्याने घडू लागले. हि चळवळ अशाप्रकारे पश्चिम बंगाल, झारखंड,मध्यप्रदेश, छत्तीसगढ, महाराष्ट्रामध्ये कमी वेळात फोफावली.  जो भाग वनसंसाधनांनी समृद्ध आहे तेथे ह्या चळवळीने कमी वेळेत जम बसवला. सरकारच्या विकासाला विरोध करणे, जे भाग वनसंसाधनांनी समृद्ध तेथे  मोठयाप्रमाणावर खाणी  सापडले .
आदिवासींना त्यांच्या जागेतून विस्थापित व्हावे लागले.
त्यांच्या जमिनी, जंगल मोठमोठया प्रकल्पामध्ये गेले, खाणींचा विकास, विकासाची कामे, धरण अशा गोष्टींमुळे मोठ्याप्रमाणावर नाराज झालेल्या ह्या वर्गाची नक्षलवादी चळवळीला सहानुभूती मिळत गेली. त्यातूनच ह्या चळवळीचे मुळ घट्ट रोवली गेली. तरुण ,युवावर्ग प्रतिशोध घेण्यासाठी  नक्षलवाद्यांच्या सशस्त्र दलात दाखल झाला. याच्यातून सरकारचे कार्यक्रम उलथून लावणे, रस्ते रातोरात उखडून टाकणे, बस्तरमध्ये 36 काँग्रेस नेत्यांवर झालेला गोळीबार, नुकतीच रस्ता निर्मितीसाठी आणलेल्या वाहन पेटवून देणे अशा गोष्टी घडू लागले. आपल्या प्रभाव क्षेत्रांमध्ये शस्त्रांचा धाक दाखवून मतदानावर बहिष्कार टाकायला लोकांना भाग पाडू लागले. सरकारी मालमत्तेची नासधुस करणे असे नक्षलवाद्यांचे कार्यक्रम सुरु झाले. विनोबा भावेंच्या भूदान चळवळीतून भूदास , शोषित वर्गाला किती प्रमाणात जमिनी मिळाल्या आणि ह्या नक्षलवादी चळवळीतून गरजूंना किती जमिनी मिळाल्या ह्या विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत. आता ही नक्षलवादी चळवळ कोणत्याही उद्देशा विना काम करताना दिसत आहे.
             समाजातील बुद्धीजीवी(स्वतःला म्हणवणारे) गटाकडून हि  समर्थन मिळत आहे.  साम्यवादी(कम्युनिस्ट) पक्ष , स्वतःला बुद्धिजीवी म्हणवणारे बुद्धिजीवी, प्रसारमाध्यमे, electronic media, फुटीरतावादी, डावे विचारवंत , यांचे कळत नकळत याला या देशविघातक कार्याला समर्थन मिळत आहे.
              तसेच समाजामध्ये  भीमा-कोरेगाव सारख्या घटनांचा फायदा घेऊन समाजामध्ये दुही निर्माण करणे, सवर्ण दलित असा संघर्ष निर्माण करणे. आपण पाहिल्यावर हे लक्षात येईल की, भीमा -कोरेगाव च्या घटनेला 200 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पुण्याच्या शनिवारवाड्यावर शौर्यदिनानिमित्त ,  एल्गार परिषद भरवणे त्याच्या मध्ये गुजरात चा नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवानी, उमर खालिद(JNU देशविरोधी घोषणा देण्यामध्ये सहभाग), प्रकाश आंबेडकर, बी. जी. कोळसे पाटील, यांचा व्यासपीठावर सहभाग,जिग्नेश मेवानी, उमर खालिद  यांची  चिथावणीखोर भाषणानी  वातावरण तापवून सवर्ण-दलित असा संघर्ष उभा करून जाणून बुजून दंगल घडवण्यात आली. याच्या भिडे गुरुजी  आणि मिलिंद एकबोटें वर आरोप करून जातीय रंग देण्यात आला.
अशा प्रकारे हे सरळ सरळ सिद्ध होते की, हा योगा योग नसून सुनियोजित कार्यक्रम आहे. अशाप्रकारे प्रत्येक गोष्टींचा वापर करून  समाजामध्ये दुही माजवणे हा यांचा ठरलेला कार्यक्रम, अशा प्रकारच्या जाणून बुजून केलेल्या षडयंत्रामध्ये  या गोष्टींपासून अनभिज्ञ असलेली जनता जातीच्या रंगामध्ये रंगून आपल्याच बंधूंचे रक्त सांडण्यासाठी विवश होते.
         तसेच मध्यंतरी निघालेली किसान लॉंग मार्च  पण अशाच प्रकारचे आंदोलन होते  शेतकऱ्यांच्या मागणी साठी निघालेली नाशिक ते मुंबई मार्च कधी नकळत लाल होतो हे समजत हि नाही. आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांच्या भावनांचा , उद्रेकाचा उपयोग करतमोर्चा लाल करत नकळत त्यांना हि  आपल्या कृत्यामध्ये जोडून घेतले. सुनियोजित पद्धतीने लाल टोपी दिली, हळूहळू लाल झेंडे दिले आणि मुंबई पर्यंत येईपर्यंत संपूर्ण मोर्चा लाल झाला. अशा प्रकारे समाजातील प्रत्येक गोष्टींचा वापर करून समाजामध्ये दुही माजवण्याची एकही संधी सोडत नाहीत. अशा प्रकारे आपल्या हक्काच्या, मालाची, उत्पादनाच्या दराची मागणी करण्यासाठी रस्त्यावर उतरलेला शेतकरीबंधू सुनियोजित जाळ्यात अडकतो. भोळ्याभावड्या शेतकऱ्याला कुठे कळतो झेंड्यांचा रंग आणि  कम्युनिसटांची चाल. तो आपल्या हक्कासाठी  रस्त्यावर उतरतो.
          तसेच जवाहरलाल विद्यापीठातील देशविरोधी घोषणा असतील... संविधान धोक्यात आहे म्हणतात.
स्वतःला संविधानाचे पाईक समजतात आणि  संसदेवर हल्ला करणाऱ्या  आतंकवादीअफजलगुरुच्या  समर्थनार्थ कॉलेज कॅम्पस मध्ये घोषणा देतात. 2010 मध्ये दाखल केलेल्या  राममंदिरेच्या  याचिकेवर अजून 2019 उजाडेल तरीअजून सुनावणी झाली नाही... परंतु ,  मुंबईवरील हल्ल्यातील आतंकवादी याकूब मेनन साठी मात्र मध्यरात्री सुप्रिम कोर्टामध्ये सुनावणी होते हा कशाप्रकारचा विरोधाभास म्हणायचं?
 ...तसेच  अजमल कसाब फाशी सिद्ध होऊन  दयेच्या अर्जावर लवकर राष्ट्रपतींनी सही केली नव्हती. हे सर्व नकळत नाही तर जाणूनबुजून केलं जातंय असं  वाटत आहे... अशा प्रकारे हा नक्षलवाद जमीन ,जंगल ,जल याच्या पुरता मर्यादित न राहता आपल्या घराच्या उंबरठ्यावर येऊन थांबला आहे. आपण लवकर सावध झालो पाहिजे .हा फोफावत चाललेला शहरी नक्षलवाद समजतील सर्व प्रकारच्या दुहीचा ,  दुफळीचा, सर्व माध्यमांचा , शिक्षण व्यवस्थेचा वापर करून आपले विचार समाजामध्ये पसरवत चालले आहे. आपण वेळीच सावध  होऊन आपल्या बंधूंना या देशविरोधी घडणाऱ्या गोष्टींचा भाग होण्यापासून वाचवलं पाहिजे!
 
                               


Comments

Popular posts from this blog

खरचं, मी पर्यावरणवादी?

                 खरचं, मी पर्यावरणवादी?                     जेव्हा गांधीजींचा एक प्रसंग माझ्या वाचनामध्ये आला.जेव्हा गांधीजी  प्रयाग येथील काँग्रेसच्या संमेलनामध्ये असताना पाण्याने हात धुत होते, तेव्हा कार्यकर्त्यांबरोबर बोलण्यात गर्क झाल्याने जास्त पाणी हातावर ओतले गेले. ते जरी अनवधानाने घडले असले तरी जास्त पाणी वाया गेल्याचे त्यांना वाईट वाटू लागले .तेवढ्यात जवाहरलालजी म्हणाले,"आपण तर गंगा-यमुनेच्या काठावर आहोत आणि पाण्याची काय कमतरता आहे.थोडे जास्त पाणी वाया गेले म्हणून कुठं बिघडलं? म.गांधीजी म्हणाले कि ,"गंगेचे पाणी सर्वांसाठी आहे, पशू,पाखरे, कीटक.. माझ्याकडून  अनवधानाने जरी जास्त पाणी वाया गेले असले तरी  मी कोणाच्या तरी वाटचा हिस्सा हिसकवला  आहे. या प्रसंगातून मला एक जाणवलं कि, आपण सकाळ पासून किती पाणी वाया घालवत असतो. शौचालयाला गेलो तरी कमीतकमी लहान दोन बादली पाणी वापरतो. तसेच स्नानासाठी गेल्यावर कमीत कमी तीन  मोठी बादली पाणी वापरतो. शौचालयातील फ्लशचा आणि स्नानगृ...

काय आहेत CAA आणि NRC?? का एवढे गैरसमज पसरवले जातं आहेत??

                आज देशभर CAA(Citizenship Amendment Act) च्या नावाने गोंधळ माजवला जात आहे. तर काय आहे हा नागरिकत्व दुरुस्ती कायदा!! काही दिवसांपूर्वी हे (Citizenship Amendment Bill) विधेयक  लोकसभा आणि राज्यसभेमध्ये बहुमताने पारित झालं. तद्नंतर 12 डिसेंबर 2019 ला राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने ह्या विधेयकाला मंजुरी मिळाली आणि पक्कं झालं कि, हा कायदा आता लागू होणार तेव्हा पासून देशामध्ये  वेगवेगळ्या  काँग्रेस च्या नेत्यांनी जाहीर भाषणे केली. हा कायदा देशामध्ये तुष्टीकरण करत आहे . तसेच हा कायदा विशिष्ट एका धर्माच्या विरुद्ध आहे असं वातावरण काँग्रेस, कम्युनिस्ट,TMC MIM, तसेच वेगवेगळ्या डाव्या विचाराच्या  विद्यार्थी संघटनांनी  इ. वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली. भारतीय नागरिकांना तळागाळापर्यंत समजेपर्यंत  खूप गैरसमज देशभर हेतुपुरस्सर  जाणूनबुजून पसरवले गेले.          त्यामुळे देशभर  आंदोलनाला हिंसक वळण मिळालं. हे हिंसक आंदोलन   लवकरच आसाम, पश्चिम बंगाल  आणि तसेच देशातील क...

हिंदू, हिंदुत्व, हिंदुराष्ट्र

स्वा. सावरकरांच्या व्याख्येनुसार जो या देशाला भूमीला पुण्यभूमी आणि पितृभूमी मानतो तो हिंदू! सावरकारांच्या व्याख्येनुसार, तर जो जो या देशांमध्ये राहतो मग तो कोणत्याही संप्रदायाचा असो(इस्लाम, ख्रिश्चन, ज्यू, पारसी) या देशाला पुण्यभूमी आणि पितृभूमी मानत असतील तर तेे सर्व हिंदू आहेत.या देशाला वेगवेगळी नाव आहेत भारत,इंडिया, हिंदुस्थान असे. राजा दुष्यांत आणि शकुंतला चे पुत्र भरत नावाचा पराक्रमी राजा होऊन गेला त्यांच्यावरून नावावरून या भूमीला 'भारत 'असे नाव पडले. इंडस(सिंधू खोरे) याच्या वरून या भूमीला 'इंडिया' असे पाश्चातानी नाव दिले.आता राहिला विषय जो नेहमी हिंदू ह्या शब्दांची उत्पत्ती कशी झाली... याचा उल्लेख तर वेद, उपनिषदामध्ये तर नाही मग याचा उगम कसा झाला तर जेव्हा इराणी लोक वायव्ये कडून भारतामध्ये व्यापाराच्या निमित्त येत असत तेव्हा त्यांनी सिंधूचा उल्लेख हिंदू  असा  करत कारण इराणी(पारसी )भाषेमध्ये 'स' चा उच्चार 'ह' असा होतो. इराणी लोक सिंधू नदीच्या खोऱ्यात बहरलेल्या सिंधू संस्कृतीला हिंदू संस्कृती म्हणत.इराणींकडून हे नाव अरबांकडे पोहचले असे हे नाव जग...