आज देशभर CAA(Citizenship Amendment Act) च्या नावाने गोंधळ माजवला जात आहे. तर काय आहे हा नागरिकत्व दुरुस्ती कायदा!! काही दिवसांपूर्वी हे (Citizenship Amendment Bill) विधेयक लोकसभा आणि राज्यसभेमध्ये बहुमताने पारित झालं. तद्नंतर 12 डिसेंबर 2019 ला राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने ह्या विधेयकाला मंजुरी मिळाली आणि पक्कं झालं कि, हा कायदा आता लागू होणार तेव्हा पासून देशामध्ये वेगवेगळ्या काँग्रेस च्या नेत्यांनी जाहीर भाषणे केली. हा कायदा देशामध्ये तुष्टीकरण करत आहे . तसेच हा कायदा विशिष्ट एका धर्माच्या विरुद्ध आहे असं वातावरण काँग्रेस, कम्युनिस्ट,TMC MIM, तसेच वेगवेगळ्या डाव्या विचाराच्या विद्यार्थी संघटनांनी इ. वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली. भारतीय नागरिकांना तळागाळापर्यंत समजेपर्यंत खूप गैरसमज देशभर हेतुपुरस्सर जाणूनबुजून पसरवले गेले.
त्यामुळे देशभर आंदोलनाला हिंसक वळण मिळालं. हे हिंसक आंदोलन लवकरच आसाम, पश्चिम बंगाल आणि तसेच देशातील काही विद्यापीठांमध्ये याचे पडसाद उमटले. प्रियांका गांधींनी जामिया विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या आंदोलनात स्वतः सहभागी झाले होते हे काय वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. ममता बॅनर्जींनी हिंसक आंदोलनाला स्वता: समर्थन दिल. हिंसक आंदोलनामध्ये देशाची संपत्ती जाळण्यात आली. सरकारी कार्यालयांचं नुकसान करण्यात आलं, तसेच काही ठिकाणी आंदोलना दरम्यान रुग्णवाहिका अडविण्यात आली. देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, वेगळ्या स्वतंत्र देशाची मागणी करण्यात आली. खरचं ही एवढी भयानक घटनादुरुस्ती आहे का, की देशाच्या अखंडतेला आव्हान दिल गेलं?? तर मुळीच नाही. मूळात CAA ही कोणाच नागरिकत्व काढून घेण्याचं नाहीतर फक्त नागरिकत्व देण्याचचं काम करते. ह्या CAA अंतर्गत या पाकिस्तान , बांगलादेश , अफगाणिस्तान मधील धार्मिक कारणावरून हिंदू , शीख , बौद्ध, पारशी, जैन , ख्रिश्चन या अल्पसंख्याक लोकांवर अत्याचार , बलात्कार , धर्मांतर , मारहाण, बळाच्या जोरावर संपत्तीची जी लूट केली याला बळी पडलेल्या पीडित लोकांना भारत सरकार ह्या CAA अंतर्गत ह्या पीडित लोकांसाठी नागरिकत्वच्या अटी शिथिल केले आहेत. याच्यामध्ये पूर्वी भारतामध्ये 11 वर्ष रहिवाशी असावं लागतं होत… ते वर उल्लेख केलेल्या सहा धर्मियांसाठी CAA अंतर्गत ते 5 वर्ष करण्यात आलं आहे. पाकिस्तानी मुस्लिम नागरिकांसाठी 11 वर्षाची तरतूद तशीच ठेवली आहे. ही घटनादुरुस्ती शरणार्थी लोकांच्या नागरिकत्वाचा प्रश्न लवकर मार्गी लागावा यासाठी ही तरतूद केली आहे. जर पाकिस्तानातील मुस्लिम नागरिकांनी अर्ज केला तर नागरिकत्व मिळेल. मागील 5 वर्षांमध्ये भारत सरकारने 566 जगातील मुस्लिम बांधवांना नागरिकत्व दिल आहे. जर पाकिस्तानी मुस्लिम नागरिकांनी अर्ज केला तर केंद्र सरकार विचार करून नागरिकत्व देईल.त्यामुळे ही घटनादुरुस्ती मुस्लिम विरोधी नाही. फक्त राजकीय पक्ष, राजकीय नेते, मीडिया,देशविरोधी शक्ती आपली पोळी भाजून घेण्यासाठी भारतीय मुस्लिम बांधवांच्या गैरसमजूतीचा फायदा घेत आहेत.
आता अजून एका विषयाने CAA बरोबर डोकं वर काढलं आहे ते म्हणजे NRC(National Register citizens)! आसाममध्ये घुसखोरांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती.आसाम मधील स्थानिक आसामी भाषिकांना असं वाटलं कि, ते त्यांच्याच राज्यात अल्पसंख्याक होत आहेत. तेव्हा आसामी जनतेने वेळोवेळी राज्यभर आंदोलन केले होते. तसेच राज्यामध्ये घुसखोरीमुळे गुन्हेगारी वाढत होती, बेरोजगाराचा प्रश्न निर्माण होत होता कुठं तरी असुरक्षितेतची भावना निर्माण झाली, आसामच्या संसाधनावर ताण येत होता.आसामी जनतेने वेळोवेळी NRC साठी मागणी केली. त्यातूनच मग काही वर्षांपूर्वी केंद्रसरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्या नुसार आसाम राज्यभर NRC लागू केली. NRC अंतर्गत नागरिकांना आपण भारताचे नागरिकत्व असल्याचे सिद्ध करावे लागणार आहे. ते सर्व धर्माच्या लोकांना लागू आहे. मग हिंदू असो मुस्लिम किंवा अन्य कोणी धर्मीय. NRC अंतर्गत नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी 24 मार्च 1971 पूर्वीचा पुरावा सादर करावे लागणार आहे. NRC अंतर्गत जे नागरिकत्व सिद्ध करू शकणार नाहीत. त्यांना देशाबाहेर काढलं जाईल. यामुळे घुसखोरी मार्फत होणाऱ्या आतंकवाद, तस्करी, गुन्हेगाराला आळा बसेल जे सर्वांच्या हिताचं आहे. ज्यामुळे सुरक्षित भारत निर्माण होईल. ह्या दोन्ही विषयांच लोकशाहीच्या मार्गाने विरोध अपेक्षित होता. परंतु देशाच्या संपत्तीचं नुकसान करून , हिंसक आंदोलन करून , देशात धर्माधर्मामध्ये भेद उभा करून भारतवर्षाची शांती भंग करून देशाच्या एकतेला आणि अखंडतेला जे आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे ,त्यांना भारतीय जनता कदापि माफ करणार नाही!!!
भारतीय चिंतन नेहमी हे सांगत आलं आहे कि, “हे विश्वची माझे घर”, “वसुधैव् कुटुंबकम्”, “अतिथी देवो भव:” हा विचार घेऊन भारतीय संस्कृती बहरत आणि फुलत आली आहे. त्यामुळे आपण शरणार्थ्यांचा सन्मान करणे हा आपला सहज स्वभाव आहे. आज देशातील काही राजकीय पक्ष, व्यक्ती शरणार्थ्यांना विरोध करून फक्त संविधानाच्या गाभ्यालाच नाहीतर आपल्या देशाच्या आत्म्यालच धक्का लावण्याचं काम करत आहेत. भारतीय चिंतन आणि विचाराने नेहमीच शरणार्थी आणि घुसखोरी यांच्या मध्ये स्पष्ट फरक करत आले आहेत. दोन्ही पूर्णपणे वेगळ्या संकल्पना आहेत . स्वतःच्याच देशातून निर्वासित झालेल्या पारशी तसेच ज्यू लोकांना वर्षांनुवर्षे आश्रय देण्याचं काम भारताने केलं आहे. आणि आज आपण CAA…NRC सारख्या गोष्टींचं स्वागत करून आपण आपल्या संस्कृतीच पुनरुज्जीवन करत आहोत.
-by Ajay Bastal
Comments
Post a Comment