Skip to main content

खरचं, मी पर्यावरणवादी?


               




 खरचं, मी पर्यावरणवादी?

                    जेव्हा गांधीजींचा एक प्रसंग माझ्या वाचनामध्ये आला.जेव्हा गांधीजी  प्रयाग येथील काँग्रेसच्या संमेलनामध्ये असताना पाण्याने हात धुत होते, तेव्हा कार्यकर्त्यांबरोबर बोलण्यात गर्क झाल्याने जास्त पाणी हातावर ओतले गेले. ते जरी अनवधानाने घडले असले तरी जास्त पाणी वाया गेल्याचे त्यांना वाईट वाटू लागले .तेवढ्यात जवाहरलालजी म्हणाले,"आपण तर गंगा-यमुनेच्या काठावर आहोत आणि पाण्याची काय कमतरता आहे.थोडे जास्त पाणी वाया गेले म्हणून कुठं बिघडलं? म.गांधीजी म्हणाले कि ,"गंगेचे पाणी सर्वांसाठी आहे, पशू,पाखरे, कीटक.. माझ्याकडून  अनवधानाने जरी जास्त पाणी वाया गेले असले तरी  मी कोणाच्या तरी वाटचा हिस्सा हिसकवला  आहे. या प्रसंगातून मला एक जाणवलं कि, आपण सकाळ पासून किती पाणी वाया घालवत असतो. शौचालयाला गेलो तरी कमीतकमी लहान दोन बादली पाणी वापरतो. तसेच स्नानासाठी गेल्यावर कमीत कमी तीन  मोठी बादली पाणी वापरतो. शौचालयातील फ्लशचा आणि स्नानगृहातील शॉवर ची गोष्ट तर सोडा. मी जाणतेपणाने किती पाणी वाया घालवत आहे. मी सृष्टीतील किती जीवांच्या वाटणीचे पाणी पळवत आहे.  मी सृष्टीचे कळत नकळत किती शोषण करत आहे. गांधीजींना अनवधानाने घडलेल्या प्रसंगावर किती पश्चात्ताप झाला. मी तर जाणतेपणाने किती पाणी वाया 
घालवत आहे. तर मग मी स्वतःला कसा काय पर्यावरण वादी म्हणू शकतो? 
             देवाने मला बुद्धी दिले म्हणून  बुद्धीच्या जोरावर या सृष्टीवर अधिराज्य करायचं का? सृष्टीतील सर्व गोष्टींचं शोषण करायचं का? मी सृष्टीतील दुसऱ्यांच्या वाटणीचे जे जे आहे त्याचा उपभोग घ्यायचा का? मी फक्त पाणीच नाहीतर, इतरांच्या वाटणीचे जमीन, जंगल, इंधन, डोंगर, नैसर्गिक संसाधने, आकाश काहीही इतरांसाठी ठेवलं नाही. मग मी कसा काय स्वता:ला पर्यावरणवादी म्हणू शकतो? मग मला नेहमी वाटत कि, मी 'Environment Club' चा सदस्य आहे, तरीपण जेव्हा स्वता:मध्ये  डोकावतो तेव्हा  स्पष्ट भाषेमध्ये आतला आवाज सांगतो कि, खरचं तु पर्यावरणवादी नाहीस!
         बिबट्या, हत्ती .. वस्ती, गाव,शहरांमध्ये येवून धुमाकूळ घालतो, मग मी विचार करू लागतो कि, नक्की ते आपल्या वस्तीमध्ये आलेत कि, आपण त्यांच्या वस्तीमध्ये गेलोय. खरचं विचार करण्यासारखी गोष्ट आहे!  मी तर त्यांच्यापण वाटणीच सोडलं नाही. मग मी कसा काय पर्यावरणवादी होऊ शकतो?
                   संत तुकाराम महाराज म्हणतात,"वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे".आपले संत निसर्गाशी किती एकरूप होते हे त्यांच्या वचनावरूनचं समजेल. किती निसर्गाशी तादात्म्य होत हे समजत. मी घरासाठी झाडे तोडतो. माझ्या गरजेपेक्षा जास्त मोठं घर बांधतो. पाच-सहा गुंठ्यात प्रशस्त बंगला बांधतो. किती तरी जमीन काबीज करतो, कितीतरी नैसर्गिक संसाधने नष्ट करतो.मी माझ्या  शेतीसाठी कितीतरी हेक्टर जमिनीसाठी झाडे तोडतो, जंगले तोडतो , नैसर्गिक संसाधने नष्ट करतो.
संत साधे रहायचे , कमीतकमी वस्तुसंग्रह करायचे, अपरिग्रह करायचे. मी तर किती तरी कपडे वापरतो, दैनंदिन कामकाजासाठी कितीतरी कागद लागतो,त्यासाठी कितीतरी झाडे तोडली जातात. तसेच विकासाच्या नावाखाली कितीतरी जंगले नष्ट केली आहेत. मी वसुंधरेच्या गर्भातील कितीतरी इंधनाचे शोषण करत आहे आतातर ते संपण्याच्या वाटेवर आहेत. माझ्या मोबाइलला रेंज यावी म्हणून  मी जागोजागी टॉवर उभे केले आहेत आणि पूर्वी माझ्या घराच्या अंगणात दाणे टिपणाऱ्या चिमण्या कितीतरी पटीने कमी झाल्या.. नव्हे नव्हे आतातर ते नजरेआड होत आहे. ज्या  आकाशामध्ये पक्षी ,पाखरे आनंदाने विहार करतात ज्या आकाशात ते अधिराज्य करत. तेथेही आता मी माझं हेलिकॉप्टर नेलं आहे,इतकचं काय तर तेथे पण मी आता विमानाने प्रवास करतो. आतातर मी तेथे पण मी निर्विवाद वर्चस्व मिळवलं आहे. मी पतंग उडवून आनंद घेत आहे, परंतु पतंगामुळे  पक्ष्यांचे कापले जाणारे गळे मला कदाचित या आनंदामुळे दिसत नाहीत. मी मनोरंजन, उदर भरण्यासाठी खूप प्राण्यांची शिकार केली, त्यामुळे कित्येक प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. मी माझ्या सोयीसाठी एका ठिकाणावरून दुसरीकडे जाण्यासाठी..वेळ वाचवा ...आरामदायी जीवनशैलीसाठी वाहनांचा उपयोग करू लागलो आणि प्रदूषण, जागतिक तापमान वाढीला निमंत्रण देवून बसलोय इतकचं नाही तर मी माझ्या सोयीसाठी अमर्याद प्लास्टिकचा वापर केला आहे. जे पृथ्वीतलावर लवकर नष्ट होत नाही. जे या सृष्टीतील माझ्याच सारखे जे जीव आहेत फक्त त्यांना बुद्धी नाही असे पशू, पाखरे, प्राणी, जलचर यांच्या शरीरात हे प्लास्टिक जात आहे. ज्यामुळे त्यांचा अकाली मृत्यू होत आहेत .हे सर्व माझं जीवन सुखकर व्हावा ..हा स्वार्थी विचार घेऊन मी करत आहे. परंतु याच्या मागे मी सृष्टीतील निसर्गातील इतर वाटेकऱ्यांना कधीही विश्वासात घेतलं नाही ..एवढच नाहीतर मी त्यांना कधी वाटेकरी समजलच नाही. मग मी स्वतःला कसा काय पर्यावरणवादी म्हणू शकतो?
                       संत म्हणायचे,"पानी तेरा रंग कैसा, जिसमे मिलाये उस जैसा!" हे वचन ऐकायला खूप छान वाटेल. परंतु जेव्हा मी पुण्यातील मुळा-मुठा नदी पाहिली तेव्हा मला असं वाटलं कि, हेच वचन "पानी तेरा रंग कैसा, जिस मे मिलाये पानी के रंग जैसा" असं म्हणता येईल. मी माझ्यासाठी कारखाने उभे केले. दूषित पाणी नदीत सोडले, पाण्याचे  रंग बदलले. माझ्या घरातील सांडपाण्यामुळे नदीतील जलचर मरत आहेत. तर मग मी कसा काय पर्यावरणवादी होऊ शकतो?
                        संत तुकाराम महाराजांच्या काळात निसर्गाचं, पर्यावरणाचं महत्त्व सांगण्यासाठी युनो, युनेस्को सारख्या संस्था नव्हत्या; तरीपण त्यांचं निसर्गाशी एवढं तादात्म्य होत, ते माझसारख एक दिवस पर्यावरण दिन साजरा करत नसत तर ते ३६५ दिवस पर्यावरण दिन साजरा करत. मी आता थोडस माझ्या सण, उत्सवांपासून लांब गेलोय, जे सण निसर्गाची पूजा करून आपण निसर्गाचे ऋणी आहोत असा भाव प्रकट करण्याचा संदेश देतात. या सणांपासून मी नकळत थोडीशी फारकत घेतली आहे. मी निसर्ग पूजक भारतीय संस्कृती विसरत  चाललो आहे . इंद्रदेवांच्या शापाने  जीवघेण्या पावसापासून ज्या गोवर्धन पर्वताने गावकऱ्यांचे रक्षण केले. त्याच पद्धतीने आपण आज पर्वतांना गोवर्धन सारख पूजन(सन्मान,संरक्षण) करायचं विसरलो! त्यामुळे  कदाचित भुस्सखलन ,उत्तराखंड ,माळीण सारख्या दुर्घटना घडत आहेत. ज्या यमुनेने बालकृष्णाला  वाट करून दिली तीच आज महापुरामुळे विध्वंस करत आहे.
‌                     मी निसर्गाला पूजन्याऐवजी त्याच रक्षण करण्याऐवजी  त्याच जास्तीत जास्त शोषण करू लागलो. माझा निसर्गाप्रति भाव बदलला आहे. म्हणून मला खरचं अस वाटतय कि, मी पर्यावरणवादी  नाही!!
 पण मी पुढं या चूका सुधारून..सर्व सृष्टीचा विचार करून निर्णय घेईन, तसेच एक  चांगला माणूस बनण्याचा नक्कीच प्रयत्न करेन.. कारण निसर्ग वॉर्निंग देत नाही तर सरळ  भूकंप, त्सुनामी, चक्रीवादळ या रुपात ऍक्शन घेते, म्हणून मी खरा पर्यावरणवादी बनण्याचा प्रयत्न करेन!!

Comments

Popular posts from this blog

काय आहेत CAA आणि NRC?? का एवढे गैरसमज पसरवले जातं आहेत??

                आज देशभर CAA(Citizenship Amendment Act) च्या नावाने गोंधळ माजवला जात आहे. तर काय आहे हा नागरिकत्व दुरुस्ती कायदा!! काही दिवसांपूर्वी हे (Citizenship Amendment Bill) विधेयक  लोकसभा आणि राज्यसभेमध्ये बहुमताने पारित झालं. तद्नंतर 12 डिसेंबर 2019 ला राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने ह्या विधेयकाला मंजुरी मिळाली आणि पक्कं झालं कि, हा कायदा आता लागू होणार तेव्हा पासून देशामध्ये  वेगवेगळ्या  काँग्रेस च्या नेत्यांनी जाहीर भाषणे केली. हा कायदा देशामध्ये तुष्टीकरण करत आहे . तसेच हा कायदा विशिष्ट एका धर्माच्या विरुद्ध आहे असं वातावरण काँग्रेस, कम्युनिस्ट,TMC MIM, तसेच वेगवेगळ्या डाव्या विचाराच्या  विद्यार्थी संघटनांनी  इ. वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली. भारतीय नागरिकांना तळागाळापर्यंत समजेपर्यंत  खूप गैरसमज देशभर हेतुपुरस्सर  जाणूनबुजून पसरवले गेले.          त्यामुळे देशभर  आंदोलनाला हिंसक वळण मिळालं. हे हिंसक आंदोलन   लवकरच आसाम, पश्चिम बंगाल  आणि तसेच देशातील क...

हिंदू, हिंदुत्व, हिंदुराष्ट्र

स्वा. सावरकरांच्या व्याख्येनुसार जो या देशाला भूमीला पुण्यभूमी आणि पितृभूमी मानतो तो हिंदू! सावरकारांच्या व्याख्येनुसार, तर जो जो या देशांमध्ये राहतो मग तो कोणत्याही संप्रदायाचा असो(इस्लाम, ख्रिश्चन, ज्यू, पारसी) या देशाला पुण्यभूमी आणि पितृभूमी मानत असतील तर तेे सर्व हिंदू आहेत.या देशाला वेगवेगळी नाव आहेत भारत,इंडिया, हिंदुस्थान असे. राजा दुष्यांत आणि शकुंतला चे पुत्र भरत नावाचा पराक्रमी राजा होऊन गेला त्यांच्यावरून नावावरून या भूमीला 'भारत 'असे नाव पडले. इंडस(सिंधू खोरे) याच्या वरून या भूमीला 'इंडिया' असे पाश्चातानी नाव दिले.आता राहिला विषय जो नेहमी हिंदू ह्या शब्दांची उत्पत्ती कशी झाली... याचा उल्लेख तर वेद, उपनिषदामध्ये तर नाही मग याचा उगम कसा झाला तर जेव्हा इराणी लोक वायव्ये कडून भारतामध्ये व्यापाराच्या निमित्त येत असत तेव्हा त्यांनी सिंधूचा उल्लेख हिंदू  असा  करत कारण इराणी(पारसी )भाषेमध्ये 'स' चा उच्चार 'ह' असा होतो. इराणी लोक सिंधू नदीच्या खोऱ्यात बहरलेल्या सिंधू संस्कृतीला हिंदू संस्कृती म्हणत.इराणींकडून हे नाव अरबांकडे पोहचले असे हे नाव जग...