स्वा. सावरकरांच्या व्याख्येनुसार जो या देशाला भूमीला पुण्यभूमी आणि पितृभूमी मानतो तो हिंदू!
सावरकारांच्या व्याख्येनुसार, तर जो जो या देशांमध्ये राहतो मग तो कोणत्याही संप्रदायाचा असो(इस्लाम, ख्रिश्चन, ज्यू, पारसी) या देशाला पुण्यभूमी आणि पितृभूमी मानत असतील तर तेे सर्व हिंदू आहेत.या देशाला वेगवेगळी नाव आहेत भारत,इंडिया, हिंदुस्थान असे. राजा दुष्यांत आणि शकुंतला चे पुत्र भरत नावाचा पराक्रमी राजा होऊन गेला त्यांच्यावरून नावावरून या भूमीला 'भारत 'असे नाव पडले.
इंडस(सिंधू खोरे) याच्या वरून या भूमीला 'इंडिया' असे पाश्चातानी नाव दिले.आता राहिला विषय जो नेहमी हिंदू ह्या शब्दांची उत्पत्ती कशी झाली... याचा उल्लेख तर वेद, उपनिषदामध्ये तर नाही मग याचा उगम कसा झाला तर जेव्हा इराणी लोक वायव्ये कडून भारतामध्ये व्यापाराच्या निमित्त येत असत तेव्हा त्यांनी सिंधूचा उल्लेख हिंदू असा करत कारण इराणी(पारसी )भाषेमध्ये 'स' चा उच्चार 'ह' असा होतो.
इराणी लोक सिंधू नदीच्या खोऱ्यात बहरलेल्या सिंधू संस्कृतीला हिंदू संस्कृती म्हणत.इराणींकडून हे नाव अरबांकडे पोहचले असे हे नाव जगभर पोहचले.अशाप्रकारे हिंदू हे नाव दुसऱ्यांनी आपल्याला दिले आहे. अशाप्रकारे मग या भूमीमध्ये राहणारा प्रत्येकजण हिंदू आहे. स्वामी विवेकानंद वारंवार हिंदूंसमोर भाषण देताना म्हणायचे " गर्व से कहों हम हिंदू हैं "| स्वामीजींना पुन्हा पुन्हा हेच अधोरेखित करायचे आहे कि,ज्या भूमीमध्ये पुरातन काळापासून देवदेवततांनी जन्म घेतला. ज्या भूमीच्या चराचरात परमात्माचा वास आहे,जी भूमी स्वर्गाहूनही पवित्र,जी जैवविविधतेने नटलेली आहे, भौगोलिक विविधता असलेली अशी सुजलाम सुफलाम भूमीत जन्म झाल्यामुळे आम्हाला गर्व वाटतो.... म्हणून स्वामी विवेेकानंद म्हणतात गर्व से कहो हम हिंदू हैं।
इथल्या लोकांचा डीएनए जर तपासून पहिला तर सर्वांचे पूर्वज हिंदूंच असतील, काही आक्रमक सोडले तर सर्व धर्मांतरित लोकांच मूळ हा हिंदू धर्मच आहे. आणि जे आक्रमक सुद्धा आता इथे मिसळून गेले आहेत त्यांचं अस्तित्व नाहीस झालं आहे . सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश एम. सी. छागला स्वता: म्हणायचे माझे खापर पणजोबा हिंदू होते... इतकंच काय महाराष्ट्राचे माजीमुख्यमंत्री बाबाराव अंतुले हि म्हणायचे की माझे पूर्वज कोकणस्थ ब्राम्हण होते. एका घटनेचा उल्लेख करतो, दिल्लीतील जामामस्जिदचे इमाम बुखारी सौदी अरबिया ला जातात तिथे काबा मस्जिद चे इमाम बुखारींना हिंदू म्हणून बोलवतात तर बुखारीं पटकन बोलतात कि मी मुस्लिम आहे इतकंच काय तर मी भारतातील सर्वात मोठ्या मशिदीचा इमाम आहे. तर काबा मस्जिदचे इमाम म्हणतात मला माहित आहे ....आम्ही जर्मनी वरून आलेल्याना जर्मन म्हणतो तर अमेरिकेतून आलेल्याला अमेरिकन तस तुम्ही हिंदुस्थानातून आला म्हणून तुम्हाला हिंदू म्हणालो. ह्या घटनेवरून हे सिद्ध होत आहे की हिंदू ह्या शब्दांबद्दल त्यांचे मत किंवा संकल्पना स्पष्ट आहे पण आपल्या इथल्यानंचच खूप गैरसमज आहेत.
विश्वकल्याणाचा, मानवतेचा विचार या भूमीतून निर्माण झाला आहे, त्याला आपण हिंदुत्व म्हणतो! हिंदू संस्कृती, वेद ,उपनिषदे,ऋषीमुनीयांच्या आचरणातून,हिंदू संस्कार, लोकजीवन ,तसेच संत,महात्मे तसेच त्याग , बलिदान समर्पणातून निर्माण झालेली विचारधारा म्हणजे हिंदुत्व! जगातील प्रत्येक संप्रदाय हे सांगतो कि, तुम्ही आमच्या प्रेषिताची पूजा केली तरच ईश्वरापर्यंत पोहचला. फक्त हिंदू धर्म हे सांगतो कि,तुम्ही कोणत्याही देवाची पूजा करा ,ते शेवटी एकाच ईश्वरापर्यंत जाणार आहे. हा वैश्विक विचार आहे. जेव्हा पारसी (इराणी) लोकांना त्यांच्या देशातून हाकलून लावण्यात आलं! तेव्हा त्यांनी गुजरात मधील एका राजाकड वास्तव्यासाठी मागणी ,तेव्हा पारसी ना भारताने स्वीकारलं.आपल्यामध्ये सामावून घेतलं. इतकच काय तर ना ज्यूंना त्यांच्या देशातून परागंदा व्हावं
लागलं तसेच जगभर ज्यू लोकांवर अन्याय, अत्याचार होत असताना ज्यूना आश्रय देणारा फक्त एकच देश होता तो म्हणजे भारत! इस्राईलच्या एका नेत्याने एक विधान केल होत एक ज्यू सर्वात जास्त सुरक्षित फक्त भारतात होते. निर्वासिताना आश्रय देणारा,शरणार्थीना आपल्या मध्ये सामावून घेणारा हा विचार म्हणजे हिंदुत्व!!
आपण पुन्हा एकदा संप्रदाय आणि धर्म यांच्यातील अंतर समजून घेतलं पाहिजे. एक प्रेषित, एक धर्मग्रंथ , एक उपासना पद्धती मानणाऱ्या समुदायाला संप्रदाय म्हणतात. तर 33 कोटी देव असून, वेगवेगळी जीवन पद्धती असून, प्रत्येकाची भाषा , उपासनापद्धती वेगवेगळी असून, आस्तिक, नास्तिका ना पण स्वीकारणारा वेगवेगळी राहणीमान असणारा, नेहमी सत्याचा शोध घेणारा, न्याय, मानवता ,वैश्विक विचार, करूणा ह्या गोष्टींचा समावेश असणाऱ्या समुदायाला धर्म म्हणतात.
हिंदू हे नाव तर आपल्याला दुसऱ्यांनी दिल आहे, आपण वर उल्लेख केला ...आणि राहिला विषय तो म्हणजे राष्ट्र ह्या संकल्पनेचा , ह्या भूमीच्या समान इतिहास , महापुरुष , भौगोलिकता, या बद्दल अभिमान बाळगतो ते म्हणजे राष्ट्र! म्हणून हे हिंदू राष्ट्र आहे. म्हणून आज आपल्याला अफगाणिस्तान पासून इंडोनेशिया पर्यंत च्या भूमीबद्दल आपल्याला आपुलकी वाटते. आजही आपण सांस्कृतिकदृष्टीने अखंड भारत ची संकल्पना मांडतो.आणि त्या दृष्टीने काम करत आहोत.
Comments
Post a Comment