Skip to main content

काश्मिर प्रश्न


         ज्या भूमीला प्राचीन काळापासून पृथ्वीवरील स्वर्ग म्हणायचे त्याला आता नरकात रूपांतर करण्यामध्ये  पाकिस्तान, दहशतवादी, अलगाववादी , हुर्रियत नेत्यांनी कोणतीही  कसर ठेवली नाही; तसेच कट्टर जिहादी गटाने त्याला धार्मिक स्वरूप देवून त्या विषयाला  धगधगत ठेवण्यामध्ये  यांचा प्रामुख्याने हात आहे.
           काश्मिरचा विषय नेहमी कोणत्या ना कोणत्या विषयामुळे  चर्चेत असतो. मग तो सामाजिक, राजकीय,   भौगोलिक,धार्मिक असो किंवा दहशतवादी  ह्या विषयामुळे काश्मिरचा प्रश्न  नेहमी धगधगत असतो.  हा प्रश्न प्रामुख्याने निर्माण झाला तो स्वातंत्रोत्तर भारतानंतर, ज्यावेळेस ब्रिटिशांनी भारतातील संस्थानिकांना  एक तर तुम्ही भारत किंवा पाकिस्तानमध्ये विलीन व्हा किंवा  किंवा स्वतंत्र रहा असे सुचवले.
ह्या ब्रिटिशांच्या निर्णयानंतर काश्मीरच्या राजा हरिसिंग ने काश्मीर संस्थानिक स्वतंत्र ठेवण्याचा निर्णय घेतला;त्याप्रमाणे काश्मीर राज्य स्वतंत्र राहीले .तिथे राजा हिंदू तर बहुसंख्याक जनता मुस्लिम होती, तसेच ह्या राज्याच्या सीमा पाकिस्तानला लागून असल्याने  तसेच ह्या राज्याच्या प्राकृतिक सौंदर्य , भौगोलिक विविधतेमुळे  तसेच इथून सहज मध्य आशिया पर्यंत जाता येते  किंवा हा भाग पाकिस्तानला सहज जोडला जाऊ शकतो तसेच बहुसंख्याक जनता मुस्लिम असल्याने अंतर्गत उठाव आणि लष्करी आक्रमणने हा भाग पाकिस्तानला सहज जोडू, आणि हा भाग उंचीवर आणि उंच उंच शिखरांचा असल्यामुळे  ह्या भागावरून जगावर नियंत्रण प्रस्थापित करू शकेल ह्या विचाराने  ऑक्टो. 1947 मध्ये पाकिस्तानने  काश्मीरवर आक्रमण केले आणि काश्मीर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला.
तेव्हा राजा हरिसिंग ने भारताकडे लष्करी मदतीची  मागणी केली.परंतु पं.नेहरूंनी राजा हरिसिंगाना प्रथमत: भारतच्या संघामध्ये पूर्ण विलीन होण्याच्या प्रस्तावावर स्वाक्षरी करण्याचा प्रस्ताव ठेवला.  राजा हरिसिंगानी  विलीनीकरण प्रस्तावावर स्वाक्षरी केली. त्या नुसार  त्यांनी कायदेशीरित्या भारताच्या संघराज्यामध्ये पूर्ण विलीन झाले. तद् नंतर काश्मिर भारताचा अविभाज्य भाग बनला.
            जम्मू आणि काश्मिर  राज्याला  ३७० कलमानुसार विशेष राज्याचा दर्जा देण्यात आला. त्या नुसार जम्मू आणि काश्मिर  राज्यासाठी वेगळा ध्वज, संविधान बनवण्याचा अधिकार मिळाला आणि त्या राज्याच्या राज्यपालाला(सदर-ए-रियासत) तर मुख्यमंत्र्याला(वजीर-ए-आझम) मानण्याचा संवैधानिक अधिकार मिळाला तसेच भारतसंघाला जम्मू आणि काश्मिर मध्ये फक्त विदेश, संरक्षण आणि संचार ह्या विषयांसंदर्भात हस्तक्षेप करण्याचा अधिकार मिळाला.
             ऑक्टो.1947च्या आक्रमणानंतर  पाकव्याप्त काश्मिर पाकिस्तानकडे  राहिला.  जम्मू आणि काश्मिर चा  भाग चीन कडे (अक्साई चीन) आहे आणि आझाद काश्मीर नावात फक्त आझाद आहे पण हाही भाग पाकिस्तानच्या प्रभुत्वाखाली आहे; तर काही  जम्मू आणि काश्मीरचा भाग पाकिस्तान कडून चीन ला भेट म्हणून देण्यात आली आहे. अशा प्रकारे काश्मिरच्या अखंडत्वाला तुकडे गेलेत. या भागाशिवाय काश्मिरची कल्पना अपूर्ण आहे.  आज जो काश्मिर आहे तो काश्मिर चे खोरे , जम्मू, लडाख असा मर्यादित आहे. हा राहिलेला काश्मिर हि भारतापासून तोडण्यासाठी  पाकिस्तान , चीन , दहशतवादी , अलगाववादी, यांचे प्रयत्न चालू आहते. मग काश्मिर विषयांसंदर्भात चीन चे पाकिस्तानला संयुक्त राष्ट्र संघात नेहमी समर्थन राहीले आहे. पाकिस्तान तसेच हुर्रियत नेते , दहशतवादी संघटना हे काश्मिर नेहमी धगधगत ठेवायचा दंगली घडवून आणायच्या , तरुण युवकांची माथेभडकवून लष्कर, पोलीस ,प्रशासनावर दगड फेक करायला लावायची.
आतंकवादी कारवाया करायचे , मग त्याच्यातून दाखवून द्यायचं कि , काश्मिर कसा अशांत आहे, काश्मिरला आझादी हवी आहे, निवडणुकांच्या दिवशी त्याच्यावर बहिष्कार घालायला लावायचा .आणि फक्त काश्मिर अशांत ठेवण्याचा प्रयत्न करायचा.  १९९२ मध्ये याच्यातूनच काश्मिरचे मूळ निवासी काश्मिरी पंडितांना  त्यांची राहती घर , संपत्ती, जमीन सोडून पळवून लावण्यात आलं, त्यांना भारताच्या इतर ठिकाणी विस्थापितांसारखं राहावं लागलं आणि जे तिथे राहिले त्यांची हत्या,  करण्यात आली  , याला कारणीभूत  आहेत.तिथले हुर्रीयत,अलगावदी नेते ...
    पाकिस्तानने  चार ही युध्दांच्या पराभवानंतर कळून चुकलं कि, भारताशी समोरासमोर युद्धकरून जिंकण असंभव आहे. म्हणून पाकिस्तानने छुप्या युद्धाचा(दहशतवादी कार्यवाया) आश्रय घेतला ज्याच्यातून  कमीत कमी दहशतवाद्यांच्या संख्येने शत्रुपक्षचा मोठ्याप्रमाणात नुकसान करू शकणाऱ्या तंत्रा चा अवलंब केला. ज्याच्यातून काश्मिर मध्ये मोठ्याप्रमाणावर भारतीय लष्काराची हानी झाली.
    काश्मिर अशांत आहे त्याला स्वातंत्र्या हवे आहे असे नेहमी पाकिस्तानने जगासमोर दाखवून देण्याचा प्रयत्न  केला, तसेच भारताकडून काश्मिर मध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन होत आहे असे खोटे पुरावे देऊन दाखवून देण्याचा प्रयत्न केला गेला परंतु  पाकिस्तानचे
खरे रूप जगाला कळले आहे.
              आज काश्मिर मध्ये फक्त ५%जनतेचा काश्मिर अशांत ठेवण्यामध्ये हात आहे परंतु ९५%जनतेला तिथे  शांती , पायाभूत सुविधा, शिक्षण आणि अलगाववाद्यांपासून, मुक्ती हवी आहे.
         काही  काश्मिर नेत्यांची इच्छा आहे की, काश्मिर पाकिस्तान बरोबर जोडलं जावं. पण जे पाकिस्तान
चे नेते म्हणतात , कि आम्ही गवत घाऊ , पण अणुबॉम्ब बनवू ..ते काश्मिरला भारताप्रमाणे विशेष सवलत , आर्थिक साहाय्य , सुरक्षा, पायाभूत सुविधा, शिक्षणांच्या , रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहेत काय??
           जम्मू आणि काश्मिरचा प्रश्न हा फक्त जम्मूरियत, काश्मिरियात, इंसानियात याच तीन त्रिसूत्राने सुटेल अस वाटत आहे.
‌            तेथील जम्मू(हिंदू),काश्मिरी खोरे(मुस्लिम),लडाख(बौद्ध)  जनतेचे प्राबल्य आहे. त्या संस्कृतीना भारताच्या मुख्य प्रवाहामध्ये आणले पाहिजे. पर्यटनाच्या मोठ्याप्रमाणावर संधी उपलब्ध केल्याने भारतातील पर्यटक मोठ्याप्रमाणावर काश्मीरमध्ये पर्यटनाला जातील त्याच्यातून तेथील  काश्मिरी जनतेला रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील. त्याच्यातून भारताच्या मुख्य प्रवाहाशी नाळ जोडली जाईल..
      तसेच अमरनाथ सारखे यात्रेला प्रोत्साहन दिल्याने नाळ जोडली जाईल. अखिल भारतीय सेवेतून आज भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये काश्मिरी युवक जबाबदारीची पद संभाळत आहेत हा सकारत्मक बद्द लच म्हणावं लागेल. काश्मिरी तरुणांनी हातामध्ये दगड, बंदुका घेण्यापेक्षा लेखणी घेतली तर  त्यांच्या मुक्तीचा मार्ग मिळेल याची जाणीव करून दिली पाहिजे.
जम्मूआणि काश्मिरचा बुऱ्हानवानी(आतंकवादी),अफझल गुरु(आतंकवादी),यासिन मलिक(हुररियत नेता),मसूद अझर(जैश-ए-महमद)हे काश्मीरचे चेहरे नसून  अथर अमीर उल शफा खान( UPSC AIR 2nd-2016), शहीद औरंगजेब(BSF commander)हे खरे काश्मीरचे चेहरे आहेत. हे  इथे आपल्याला लक्षात घ्यावे लागेल! अश्याप्रकारे काश्मीरचे जो एकदा प्रश्न निर्माण झालयं तो अजून तसाच राहिला आहे.

                 
           
         
         
             
           

               
                   

Comments

Popular posts from this blog

खरचं, मी पर्यावरणवादी?

                 खरचं, मी पर्यावरणवादी?                     जेव्हा गांधीजींचा एक प्रसंग माझ्या वाचनामध्ये आला.जेव्हा गांधीजी  प्रयाग येथील काँग्रेसच्या संमेलनामध्ये असताना पाण्याने हात धुत होते, तेव्हा कार्यकर्त्यांबरोबर बोलण्यात गर्क झाल्याने जास्त पाणी हातावर ओतले गेले. ते जरी अनवधानाने घडले असले तरी जास्त पाणी वाया गेल्याचे त्यांना वाईट वाटू लागले .तेवढ्यात जवाहरलालजी म्हणाले,"आपण तर गंगा-यमुनेच्या काठावर आहोत आणि पाण्याची काय कमतरता आहे.थोडे जास्त पाणी वाया गेले म्हणून कुठं बिघडलं? म.गांधीजी म्हणाले कि ,"गंगेचे पाणी सर्वांसाठी आहे, पशू,पाखरे, कीटक.. माझ्याकडून  अनवधानाने जरी जास्त पाणी वाया गेले असले तरी  मी कोणाच्या तरी वाटचा हिस्सा हिसकवला  आहे. या प्रसंगातून मला एक जाणवलं कि, आपण सकाळ पासून किती पाणी वाया घालवत असतो. शौचालयाला गेलो तरी कमीतकमी लहान दोन बादली पाणी वापरतो. तसेच स्नानासाठी गेल्यावर कमीत कमी तीन  मोठी बादली पाणी वापरतो. शौचालयातील फ्लशचा आणि स्नानगृ...

काय आहेत CAA आणि NRC?? का एवढे गैरसमज पसरवले जातं आहेत??

                आज देशभर CAA(Citizenship Amendment Act) च्या नावाने गोंधळ माजवला जात आहे. तर काय आहे हा नागरिकत्व दुरुस्ती कायदा!! काही दिवसांपूर्वी हे (Citizenship Amendment Bill) विधेयक  लोकसभा आणि राज्यसभेमध्ये बहुमताने पारित झालं. तद्नंतर 12 डिसेंबर 2019 ला राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने ह्या विधेयकाला मंजुरी मिळाली आणि पक्कं झालं कि, हा कायदा आता लागू होणार तेव्हा पासून देशामध्ये  वेगवेगळ्या  काँग्रेस च्या नेत्यांनी जाहीर भाषणे केली. हा कायदा देशामध्ये तुष्टीकरण करत आहे . तसेच हा कायदा विशिष्ट एका धर्माच्या विरुद्ध आहे असं वातावरण काँग्रेस, कम्युनिस्ट,TMC MIM, तसेच वेगवेगळ्या डाव्या विचाराच्या  विद्यार्थी संघटनांनी  इ. वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली. भारतीय नागरिकांना तळागाळापर्यंत समजेपर्यंत  खूप गैरसमज देशभर हेतुपुरस्सर  जाणूनबुजून पसरवले गेले.          त्यामुळे देशभर  आंदोलनाला हिंसक वळण मिळालं. हे हिंसक आंदोलन   लवकरच आसाम, पश्चिम बंगाल  आणि तसेच देशातील क...

हिंदू, हिंदुत्व, हिंदुराष्ट्र

स्वा. सावरकरांच्या व्याख्येनुसार जो या देशाला भूमीला पुण्यभूमी आणि पितृभूमी मानतो तो हिंदू! सावरकारांच्या व्याख्येनुसार, तर जो जो या देशांमध्ये राहतो मग तो कोणत्याही संप्रदायाचा असो(इस्लाम, ख्रिश्चन, ज्यू, पारसी) या देशाला पुण्यभूमी आणि पितृभूमी मानत असतील तर तेे सर्व हिंदू आहेत.या देशाला वेगवेगळी नाव आहेत भारत,इंडिया, हिंदुस्थान असे. राजा दुष्यांत आणि शकुंतला चे पुत्र भरत नावाचा पराक्रमी राजा होऊन गेला त्यांच्यावरून नावावरून या भूमीला 'भारत 'असे नाव पडले. इंडस(सिंधू खोरे) याच्या वरून या भूमीला 'इंडिया' असे पाश्चातानी नाव दिले.आता राहिला विषय जो नेहमी हिंदू ह्या शब्दांची उत्पत्ती कशी झाली... याचा उल्लेख तर वेद, उपनिषदामध्ये तर नाही मग याचा उगम कसा झाला तर जेव्हा इराणी लोक वायव्ये कडून भारतामध्ये व्यापाराच्या निमित्त येत असत तेव्हा त्यांनी सिंधूचा उल्लेख हिंदू  असा  करत कारण इराणी(पारसी )भाषेमध्ये 'स' चा उच्चार 'ह' असा होतो. इराणी लोक सिंधू नदीच्या खोऱ्यात बहरलेल्या सिंधू संस्कृतीला हिंदू संस्कृती म्हणत.इराणींकडून हे नाव अरबांकडे पोहचले असे हे नाव जग...