समुद्र आणि जंगल यांच्या मध्ये असलेलं चिंचोळ राज्य म्हणजे 'केरळ'. दक्षिणेकडील राज्यांपैकी एक राज्य, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन अशी संमिश्र धार्मिक लोकजीवन प्रणाली असलेलं राज्य! केरळ एक तर राजकीय किंवा धार्मिक कारणांनी होणाऱ्या हत्त्येसाठी नेहमी चर्चेत असतो, सध्या केरळ जलप्रलयच्या बातम्यांनी चर्चेत आहे.
केरळ हे पश्चिम घाटावर येणार राज्य, नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध त्यामुळे साहजिकच 'खाण' आणि 'पर्यटन' व्यवसायांचा मोठयाप्रमाणावर विकास झाला आणि याच्यातूनच केरळ सरकारला मोठयाप्रमाणावर उत्पन्न मिळत आहे. त्यातच ह्या केरळसरकारने जैवविविधतेने समृद्ध असल्याने तसेच पर्यटनस्थळांचा विकास याच्यातून अनेक नवीन कृत्रिम बंधारे विकसित केले नि नवीन पर्यटनस्थळे विकसित केले.तसेच हे राज्य नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असल्याने 'खाण'विकास आणि उत्खनन हि या राज्यामध्ये मोठ्याप्रमाणावर झाल.
पश्चिमघाटवरील पर्यावरणाचा अभ्यासकरण्यासाठी केंद्रसरकारने पर्यावरणतज्ज्ञ
माधवराव गाडगीळांच्या नेतृत्त्वाखाली एक
समिती गठित केली आणि गाडगीळ समितीने विकास नि खाण उत्खननामुळे केरळमध्ये मोठ्याप्रमाणावर पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे नि केरळ मधील भाग 'पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील' आहे असा अभ्यासाअंती निर्णय दिला.
गाडगीळ समितीचा निर्णय सौम्य करण्यासाठी
दुसरी समिती गठित करण्यात आली. त्यानुसार त्यांनी हा गाडगीळ समितीचा निर्णय सौम्य केला नि उत्खनन चालूच ठेवले.
आज आपण पाहत आहेच की शंभर वर्षामध्ये पडला नाही एवढा पाऊस केरळमध्ये झाला. नाले तुंबून वाहू लागली. पावसाच्या पाण्याचा निचरा झाला नाही;गावच्या गावे पाण्याखाली फस्त झाली, नि मोठयाप्रमाणावर जीवित नि वित्तहानी झाली. लाखोंच्या लाखो बेघर झाली . आज १५ दिवस झाले हे चिंचोळे राज्य प्रलयंकारी पुरास तोंड देत आहे.
✍🏻अजय बस्ताळ
Comments
Post a Comment