खरचं, मी पर्यावरणवादी? जेव्हा गांधीजींचा एक प्रसंग माझ्या वाचनामध्ये आला.जेव्हा गांधीजी प्रयाग येथील काँग्रेसच्या संमेलनामध्ये असताना पाण्याने हात धुत होते, तेव्हा कार्यकर्त्यांबरोबर बोलण्यात गर्क झाल्याने जास्त पाणी हातावर ओतले गेले. ते जरी अनवधानाने घडले असले तरी जास्त पाणी वाया गेल्याचे त्यांना वाईट वाटू लागले .तेवढ्यात जवाहरलालजी म्हणाले,"आपण तर गंगा-यमुनेच्या काठावर आहोत आणि पाण्याची काय कमतरता आहे.थोडे जास्त पाणी वाया गेले म्हणून कुठं बिघडलं? म.गांधीजी म्हणाले कि ,"गंगेचे पाणी सर्वांसाठी आहे, पशू,पाखरे, कीटक.. माझ्याकडून अनवधानाने जरी जास्त पाणी वाया गेले असले तरी मी कोणाच्या तरी वाटचा हिस्सा हिसकवला आहे. या प्रसंगातून मला एक जाणवलं कि, आपण सकाळ पासून किती पाणी वाया घालवत असतो. शौचालयाला गेलो तरी कमीतकमी लहान दोन बादली पाणी वापरतो. तसेच स्नानासाठी गेल्यावर कमीत कमी तीन मोठी बादली पाणी वापरतो. शौचालयातील फ्लशचा आणि स्नानगृ...