प.बंगालमधील नक्षलबाडी येथून चालू झालेली जमीनदारांच्या विरोधातील हि चळवळ आज भारतातील मोठ्यामोठ्या शहरांच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या रूपांमध्ये पोहचली आहे. प्रथमतः मुझुमदार, सन्याल यांनी ही चळवळ भूदास, शेतमजूर यांच्यासाठी जमीनदाराच्या विरुद्ध सशस्त्र क्रांतीचा मार्ग अवलंबला. सुरूवातीला हि चळवळ जमीनदारांच्या जमीनी बळकावून भूदास,शेतमजूर, शोषित यांच्या मध्ये वाटण्यात आली आणि नक्षलवादी चळवळ काही अंशी यशस्वी झाली. नंतर हि खूप प्रसिद्ध झाली याच्यातूनच आदिवासी, भूदास, शेतमजूर, शोषित , वंचित असे समाजातील वेगवेगळे गटातील लोक नक्षलवादी चळवळीला जोडत गेले. हि चळवळ झपाट्याने देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचली. जंगल, जमीन,जल याच्या साठी आपण लढत आहोत असे नक्षलवादी नेतृत्वाने बिंबवण्यास सुरुवात केली.याच्यातूनच मग विकासाला विरोध, राजकीय लोकांची हत्या, प्रशासनाच्या कामांमध्ये अडथळे निर्माण करण्यासारखे गोष्टी घडू लागले, पोलीस दलावर गोळीबार करणे असे सातत्याने घडू लागले. हि चळवळ अशाप्रकारे पश्चिम बंगाल, झारखंड,मध्यप्रदेश, छत्तीसगढ, महाराष्...