स्वा. सावरकरांच्या व्याख्येनुसार जो या देशाला भूमीला पुण्यभूमी आणि पितृभूमी मानतो तो हिंदू! सावरकारांच्या व्याख्येनुसार, तर जो जो या देशांमध्ये राहतो मग तो कोणत्याही संप्रदायाचा असो(इस्लाम, ख्रिश्चन, ज्यू, पारसी) या देशाला पुण्यभूमी आणि पितृभूमी मानत असतील तर तेे सर्व हिंदू आहेत.या देशाला वेगवेगळी नाव आहेत भारत,इंडिया, हिंदुस्थान असे. राजा दुष्यांत आणि शकुंतला चे पुत्र भरत नावाचा पराक्रमी राजा होऊन गेला त्यांच्यावरून नावावरून या भूमीला 'भारत 'असे नाव पडले. इंडस(सिंधू खोरे) याच्या वरून या भूमीला 'इंडिया' असे पाश्चातानी नाव दिले.आता राहिला विषय जो नेहमी हिंदू ह्या शब्दांची उत्पत्ती कशी झाली... याचा उल्लेख तर वेद, उपनिषदामध्ये तर नाही मग याचा उगम कसा झाला तर जेव्हा इराणी लोक वायव्ये कडून भारतामध्ये व्यापाराच्या निमित्त येत असत तेव्हा त्यांनी सिंधूचा उल्लेख हिंदू असा करत कारण इराणी(पारसी )भाषेमध्ये 'स' चा उच्चार 'ह' असा होतो. इराणी लोक सिंधू नदीच्या खोऱ्यात बहरलेल्या सिंधू संस्कृतीला हिंदू संस्कृती म्हणत.इराणींकडून हे नाव अरबांकडे पोहचले असे हे नाव जग...