जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय मधील इतिहास संशोधन केंद्राचे अध्यक्ष तसेच दिवंगत प्राध्यापक बिपीन चंद्र यांचे ' आधुनिक भारत का इतिहास' या पुस्तकामध्ये क्रांतिकारकांना, आतंकवादी असा शब्दप्रयोग केला आहे. तसेच महात्मा गांधीजींची हत्या करणाऱ्यांचा हिंदू कट्टरपंथी असा उल्लेख केला आहे. अबुल कलाम आझाद राष्ट्रवादी तर भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त मात्र आतंकवादी असा पक्षपाती शब्दप्रयोग का? हे पुस्तक साधसुधं नाही , या पुस्तकाचा उपयोग संघ लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या सर्व अखिल भारतीय सेवांच्या परीक्षेचा अभ्यास करणारे जवळजवळ सर्व विद्यार्थी ह्या पुस्तकाचा उपयोग पाठ्यपुस्तकासारखा करतात. हे पुस्तक लोकशाहीमधील महत्त्वाचा स्तंभ समजला जाणारा नोकरशाही मधील जबाबदारीच्या व्यक्तींचा बौद्धिक खुराक आहे. थोडा विचार करण्यासारखा आहे!!!